Skip to Content

ठेकेदार कसा निवडावा ?

अनुभव व रेट

घर बांधकामासाठी ठेकेदार कसे निवडावे ?

तुमच्या घराचा खर्च, बांधकामाचा दर्जा, मजबूती व घराचे आयुष्य, त्याची सुंदरता व सुबकता, अश्या अनेक गोष्टींसाठी ठेकेदार हा मोठ्या प्रमाणात जिम्मेदार असतो. म्हणून ठेकेदार निवडताना खालील ६ ठळक मुद्द्यांचा नक्की विचार करावा.

१) अनुभव

२) रेट

३) गुणवत्ता

४) स्पीड

५) टीम

६) व्यवहार

हे ६ मुद्दे एकाच ठेकेदारात मिळणे म्हणजे बायकोशी ३६ गुण पत्रिका जुळण्यासारखे आहे. जुळले तर नशीबचं..

आणि नाही जुळले तरी आपलीच समजुन जुळवून घेणे.

म्हणून ठेकेदार निवडताना वरील मुद्दे जास्तीत जास्त तुमच्या फायद्याचे ठरतील अश्या प्रकारे व्यवहार करावा.

पण जास्तीत जास्त लोक फक्त रेट चा विचार करतात. कारण त्यांना कमी रेट म्हणजे स्वस्त आहे वाटते. पण हाच स्वस्त रेट शेवटी महागात पडतो.म्हणून आज आपण इथे रेट बद्दल आधी बोलूया.

रेट कसा ठरवणार ?

बांधकामाचा रेट ठरविताना २ प्रकारच्या किंमती (Cost) कडे लक्ष देणे आवश्यक असते.

१) Direct Cost

२) Hidden Cost

१) Direct Cost

ही Cost म्हणजे वाघाला सापळ्यात अडकिण्यासाठी बांधलेली शेळी. यामध्ये प्रामुख्याने slab Rate सांगून त्यात discount दिल्याचा आव आणला जातो.

यामध्ये जास्तीत जास्त घर मालकांची फसवणूक होते.

उदा. 

रू. १५० / sq ft सांगणे, व नंतर १४५, १४० असे कमी करणे. कोणता ठेकेदार किती कमी करेल हे त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर व कमावलेल्या नावावर अवलंबून असते. काही ठेकेदार fixed rate नुसार काम करणारे सुध्दा असतील.

पण मग rate कमी केल्यानंतर सुध्दा घर मालकांची फसवणुक कशी होऊ शकते?

तर ते लपलेली असते Hidden Cost मधे.

समजा तुम्ही १००० sq ft स्लॅब असलेला घर बांधत आहात, आणि ठेकेदाराचा rate १५० / sq ft ठरला आहे, तर तुम्हाला वाटणारी बांधकामाची cost म्हणजे,

१००० X १५० = १,५०,००० /-

परंतु ही झाली Direct Cost. यामध्ये बऱ्याच गोष्टींचे rate तुम्ही ठरवलेच नाही. कारण तुम्हाला त्याची माहिती अपूर्ण होती. ते सर्व Hidden Cost मधे येते.

२) Hidden Cost

यामध्ये घर मालकाला खालील गोष्टींचे rate व मोजण्याची पध्दत समजुन घेणे व त्यानुसार ठेकेदार निवडणे फायदेशीर ठरते.

अ) कंपाऊंड वॉल (रेट व मोजण्याची पध्दत)

ब) parapet वॉल (रेट व मोजण्याची पध्दत)

क) जिना ( पायऱ्या + टॉवर ) (रेट व मोजण्याची पध्दत)

ड) कॉलम चे + गडर चे खड्डे (रेट व मोजण्याची पध्दत)

ई) भरण भरणे

फ) मिनी स्लॅब + गडर चा स्लॅब (रेट व मोजण्याची पध्दत)

याशिवाय घराची डिझाईन , पडती , बाल्कनी , प्लास्टर वरील पट्टे , इत्यादी गोष्टींचा सुद्धा पूर्ण ठराव करुन मगच निर्णय घ्यावे.

बहुतांश ठेकेदार Direct Cost कमी सांगुन काम घेतात व Hidden Cost मध्ये जास्त रेट लावतात. म्हणून शेवटी घराची total labour cost वाढते.

तर ही झाली आपल्या अनुभव व रेट ची माहिती.

आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल.

या माहितीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत Share करा, आणि त्यांची सुध्दा माहिती वाढवा.

तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही दिलेल्या नंबर वर संपर्क साधू शकता. अडचणीचा निवारण करण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करु.

बाकीच्या मुद्द्यांवर चर्चा आपण पुढच्या ब्लॉग मध्ये करणार. धन्यवाद.

Written by,

Er Nikhil Nagpure

प्लॉट खरेदी करतांना...
"Price Vs Value"